Eco-Friendly-Ganpati
Eco-Friendly-Ganpati 
पुणे

स्वत: तयार करा इको फ्रेंडली बाप्पा

सकाळवृत्तसेवा

पुणे - आपला लाडका बाप्पा स्वत:च्या हाताने तयार करण्याची व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची संधी ‘सकाळ’ घेऊन येत आहे. गणेशमूर्ती घडवण्यास शिकवणारी अभिनव कार्यशाळा रविवारी (ता. ९) आयोजित केली आहे.

पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांप्रमाणे सर्व वयोगटांसाठी ही कार्यशाळा होणार आहे. फिनिक्‍स मार्केटसिटी (विमाननगर), पाठशाळा (बाणेर व रहाटणी), क्‍लारा ग्लोबल स्कूल (हडपसर), नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता व विद्यापीठ रस्ता) सिटी प्राइड स्कूल (निगडी), मॅक्‍स स्टोअर (औंध), अभिषेक इंटरनॅशनल स्कूल (मोशी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), सिटी वर्ल्ड स्कूल (सिंहगड रस्ता) आणि संस्कृती नॅशनल स्कूल (धायरी) येथे सर्व कार्यशाळा सकाळी १० ते ११.३० वा. होणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी चौकटीत दिलेल्या केंद्रांवर नोंदणी आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी येताना सोबत बसण्यासाठी मॅट, कंपास पेटी, पाण्याची बाटली, छोटा रुमाल, जुने वर्तमानपत्र, पेंटिंगचा ब्रश, बाऊल, तिकिट सोबत आणावे. कार्यशाळेच्या ठिकाणी शाडू माती देणार असून, तयार केलेल्या मूर्ती घरी नेता येतील. सहभागींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या कार्यशाळेचे प्रायोजक असून फिनिक्‍स मार्केटसिटी, क्‍लारा ग्लोबल स्कूल, मॅक्‍स फॅशन, सेंट्रल मॉल, सिटी वर्ल्ड स्कूल हे सहप्रायोजक आहेत.

कार्यशाळा 
 काय - सकाळ इको गणपती -२०१८
 कधी - रविवार, ९ सप्टेंबर २०१८  वेळ - सकाळी १० ते ११.३०
 शुल्क - ५० रुपये   प्रवेश - सर्व वयोगटांसाठी 
 संपर्क - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

नोंदणीची ठिकाणे आणि वेळ  -
 फिनिक्‍स मार्केट सिटी, विमाननगर (दु. १२ ते ९)
 पाठशाळा, बाणेर (दु. १२ ते ४), रहाटणी (स. १० ते २) 
 क्‍लारा ग्लोबल स्कुल, हडपसर (स. १० ते ३)
 पुणे सेंट्रल मॉल कर्वे रस्ता, विद्यापिठ रस्ता (दु. १ ते रा. ८) 
 मॅक्‍स स्टोअर, औंध (स. १२ ते ८) 
 अभिषेक इंटरनॅशनल स्कूल, मोशी  (स. ९ ते २) 
 महत्त्वाचे : नावनोंदणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊनच करावी, फोनवर नोंदणी करता येणार नाही. कार्यशाळेसाठी जागा मर्यादित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT