amol kolhe 
पुणे

हवेली तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी अमोल कोल्हे मैदानात

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : पूर्व हवेलीमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचात प्रशासन, आरोग्य विभागासह सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांना कोणत्याही प्रकारची मदत कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन खासदार अमोल कोल्हे यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे दिले. 

पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधित रुग्णांना स्थानिक परीसरातच चांगले उपचार मिळावेत, यासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी लागणारे व्हीएमटी किटची संख्या वाढवून मिळण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या समवेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेणार असल्याचेही खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर केले. 

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडीसह पूर्व हवेलीत मागिल काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमानात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी उरुळी कांचन विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (ता. २) सायंकाळी उरुळी कांचन येथे घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांच्या समवेत बोलताना त्यांनी वरील आश्वासन दिले. 

या वेळी आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य आधिकारी सचिन खरात, निरीक्षक सुरज बंडगर याच्यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. 

आमदार अशोक पवार म्हणाले की, करोनाच्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त शासनाची नसून, नागरिकांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच पूर्व हवेलीमधील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम उत्तम रितीने सुरू आहे. लोणी काळभोर येथील कोरोना केअस सेंटरमुळे लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय आधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांनी विनामास्क बाहेर पडू नये.

पूर्व हवेलीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन,  कोविड 19 च्या तपासणीसाठी आवश्यक असणारे कीट जास्तीत जास्त मिळावेत, यासाठी संबधित विभागाच्या वरिष्ठ शासकीय अधिका-यांबरोबर चर्चा झाली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीला पुढील दोन दिवसात अतिरिक्त टेस्टिंग किट उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्ण तपासणीचा वेग नक्कीच वाढणार आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात वीस शासकीय बेड उपलब्ध आहेत. त्याची संख्या एकशेवीसवर नेण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत चर्चा झाली आहे. यामुळे लवकरच आणखी शंभर बेड संबधित रुग्णालयच मिळणार आहेत. 
 -  अमोल कोल्हे, खासदार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT