quarantine 
पुणे

पुण्या- मुंबईतून आलेल्यांवर आंबेगावात करडी नजर 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात साकोरे व शिनोली येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. अजून पाच संशयितांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

या पार्श्वभूमीवर तालुक्‍यात पुणे व मुंबईहून आलेल्या आठ हजार जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना घराबाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यांचावर करडी नजर ठेवण्यासाठी व कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंचर व घोडेगाव पोलिसांनी तीन भरारी पथके रात्रंदिवस कार्यरत केली आहेत. 

आंबेगाव तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण व 50 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मंचर शहरात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. पुणे व मुंबईहून आलेल्या 350 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. किराणा, भाजीपाला, औषधे व अन्य जीवनावश्‍यक वस्तू त्यांना घरपोच करण्याचा निर्णय सरपंच दत्ता गांजाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समितीने घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य, कामगार तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा समावेश असलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समित्या प्रत्येक वॉर्डात स्थापन केल्या असून, संबंधितांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्धी पत्रकात दिले आहेत. याबाबत ध्वनिक्षेपकावरून शहरात जनजागृती सुरू आहे. 

या व्यतिरिक्त अडचण आल्यास किंवा प्रतिसाद न मिळाल्यास इमर्जन्सी कॉल म्हणून गांजाळे यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक (901104444) दिला आहे. एकूण सहा वॉर्डमध्ये या समित्या काम करणार आहेत. परगावावरून व परराज्यातून आलेल्या व्यक्तींना व त्यांच्या नातेवाइकांना चौदा दिवस घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर फिरताना आढळल्यास मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना महात्मा गांधी विद्यालयाच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. महात्मा गांधी विद्यालयात सध्या पाच जणांना होम क्वारंटाइन केले आहे. 

मंचर शहरासह आंबेगाव तालुक्‍यातील 104 गावांत होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्याचे काम मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्याची तीन भरारी पथके करणार आहेत, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अनेक गावांत होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा दल समित्यांना दाद देत नाहीत. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. त्यामुळे पोलिसांची तीन भरारी पथके 24 तास कार्यरत केली आहेत. घराबाहेर पडणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT