Electricity_Bills 
पुणे

महावितरणला थकबाकीदारांची पॉवर; पश्चिम महाराष्ट्रात 480 कोटींचा भरणा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला कठीण समयी साथ देत पश्चिम महाराष्ट्रातील ४ लाख घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिन्याभरात ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. मात्र, अद्यापही याच वर्गवारीतील तब्बल २३ लाख ७० हजार ७०० ग्राहकांकडे १३८४ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने नाइलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू राहणार आहे.

गेल्या १५ फेब्रुवारीपर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात २७ लाख ७२ हजार ३६० घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांकडे १८६४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वीजग्राहकांशी संवाद साधत आहेत. त्यास प्रतिसाद देत गेल्या महिन्याभरात, १५ मार्चपर्यंत ४ लाख १ हजार ७०० थकबाकीदारांनी ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ५२ हजार ३८० घरगुती ग्राहकांनी ३०३ कोटी ३७ लाख, ४१ हजार ६२० वाणिज्यिक ग्राहकांनी १२० कोटी ४० लाख तर ७६६० औद्योगिक ग्राहकांनी ५५ कोटी ५६ लाखांच्या थकबाकीचा भरणा केला आहे, अशी माहिती प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली.

अशी आहे थकबाकी
पुणे - ७३८ कोटी १३ लाख,
सातारा - ७५ कोटी ३३ लाख,
सोलापूर - १७८ कोटी ६५ लाख
सांगली - १३६ कोटी ४७ लाख
कोल्हापूर - २५५ कोटी ९६ लाख

सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरू
चालू आणि थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा इतर ऑनलाइन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT