Pune Electricity News sakal
पुणे

पुणे, पिंपरीत वीज खंडित, तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठाही थांबला

सकाळ डिजिटल टीम

आज पहाटेपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पुणे - लोणीकंद ते चाकण दरम्यान असलेल्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे आज पहाटेपासून पुणे (Pune) व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचा परिणाम संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचं सांगितलं आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. (Pune Electricity News)

पाणीपुरवठा विभागाकडून आवाहन करताना सांगण्यात आलं की, महाराष्ट्रराज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी ६ पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे . तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे .नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरावे.

महापारेषणाची लोणीकंद ते चाकण दरम्यान मोठी वीज वाहिनी आहे. त्यामध्ये बिघाड झाल्याने पहाटेपासून वीज बंद आहे. पुढील काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात हडपसर, कोंढवा, कात्रज, धायरी, स्वारगेट, बाणेर, कोथरूड शिवाजीनगर रस्ता रोड फाटा रोड आजचा भाग वडगाव शेरी चंदन नगर टिंगरे नगर येरवडा यासह सर्वच भागातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झालेला आहे पिंपरी-चिंचवड शहरातील पहाटेपासून वीज गेलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT