velhe.jpg 
पुणे

वेल्ह्यातील `ते` दृश्य पाहून अधिकारीही गहिवरले...

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत आलेला पुणे, मुंबईसह इतर शहरातून गावाकडे आलेला चाकरमनी या चक्रीवादळामध्ये पुरता चक्रावला असून
चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. तर भर पावसाळ्यात घर कसे उभारायचे या प्रश्नास निरुत्तर होत दुर्गम भागातील अनेकांच्या व्यथा पाहून त्या तालुक्यातील प्रशासनासह लोकप्रतिनिधी ही गहिवरले. तालुक्यामध्ये अकराशे घरांचे कमी अधिक नुकसान झाले आहे.

तालुक्यामध्ये तहसिलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, उपसभापती सीमा राऊत, पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

वेल्हे तालुक्यातील रायगड जिल्ह्यालगतच्या गावांना जोरदार फटका बसला असून अतिदुर्गम घोल, गारजाईवाडी, टेकपोळे, धापसरे, वंजारवाडी, आंबेगाव, माणगाव, डिगेवस्ती, चांदर खानु, घिवशी, पोळे, धिसर, केळद परिसरासह तालुक्यातील अनेक गावात घर, शेतीचे फळझाडांचे मोठे नुकसान झाले आहे. वेल्हे तालुक्यात कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने प्रत्येक गावातील अनेक नागरीक हे पुणे, मुंबई व इतर शहरात नोकरीनिमित्त रहात असतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जणांनी गावचा रस्ता धरला होता

अगोदरच लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्यांना तर काहींना रहावयास साधे छप्पर राहिले नसल्याने ऐन पावसाळ्यात रहायचे कोठे या यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. तहसिलदार शिवाजी शिंदे म्हणाले, दुर्गम भागामध्ये अद्यापही नुकसानीचे पंचनामे चालू असून आत्तापर्यंत अकराशे घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवतरे व सभापती प्रमोद काकडे यांनी  वेल्हे तालक्याचा पाहणी दौरा केला असून वेल्हे
पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य यंत्रणा, खरीप हंगामपूर्व तयारी, पाणी टंचाई, शिक्षण, यासह इतर विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अमोल नलावडे यांनी वेल्हे तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा परिषदेकडून भरीव तरतुदीची मागणी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT