Coronavirus1 
पुणे

धक्कादायक ! पुण्यात अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

वारजे / वारजे माळवाडी - कोरोनाचा संसर्ग झालेल्या वारज्यातील अकरा वर्षांच्या मुलाचा सोमवारी मृत्यू झाला. या भागातील हा पहिला, तर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील हा दुसरा मृत्यू आहे. 

या मुलाला काही दिवसांपासून ताप येत होता. त्याने तात्पुरत्या स्वरूपात घरीच उपचार केले होते. मात्र, हा ताप जास्तच वाढल्याने तो त्याच्या डोक्यात गेला होता. त्याला रविवारी (ता.३ ) ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्याच रात्री उशीरा त्याचे निधन झाले अशी माहिती वारजे कर्वेनगर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुणा तारडे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दरम्यान, त्याच्या संपर्कातील ३४ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. तसेच कर्वेनगर भागातील चाळीस वर्षीय महिलेला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोमवारी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्या शिवाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात काम करतात. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आता पर्यंत १२ रूग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील सात बरे झाले आहेत. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १ मे रोजी वारजे माळवाडीत कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाच्या संपर्कातील ३२ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : वर्धा बाजार समितीत गव्हाची वाढली आवक

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

'ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! कधी आणि कुठे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT