Education 
पुणे

अकरावीच्या विद्यार्थ्यांना अन्य प्रवर्ग निवडण्याची सुविधा

सकाळवृत्तसेवा

पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारने मान्यता दिल्याने शिक्षण विभागाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कार्यवाही सुरू केली आहे. दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम आणि एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्यांना अन्य प्रवर्ग निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षण विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिकेच्या क्षेत्रातील अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकात यापूर्वी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातून (एसईबीसी) अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलाची संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, त्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रमही बदलता येईल. प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी पाच डिसेंबरला जाहीर होणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया
सुधारित वेळापत्रक

  • प्रवेश अर्ज भाग एक आवश्‍यक असल्यास बदल करणे व पसंतीक्रम नोंदविणे : १ डिसेंबरपर्यंत
  • गुणवत्ता यादी जाहीर करणे : ५ डिसेंबर (सकाळी ११ वाजता)
  • महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे : ५ डिसेंबर (सकाळी ११ वाजल्यापासून) ते ९ डिसेंबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
  • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १० डिसेंबर

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT