pradip sharma 
पुणे

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात शर्मा हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून येरवडा तुरुंगात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात करण्यात आली आहे. सोमवारी त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तुरुंगात असताना गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळं त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोनोग्राफी करण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी शर्मा यांना पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अॅन्टिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी प्रदीप शर्मांची ओळख आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्यावर आत्तापर्यंत 113 एन्काऊंटर्सची नोंद आहे.

दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती. नालासोपारा इथून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT