engineer boy suicide in depression after lost job Lock down 
पुणे

पुण्यात लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानं नैराश्य; इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने एका अभियंता युवकाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोंढवा भागातील एका सोसायटीत घडली असून मंगळवारी सकाळी उघड़कीस आली. ॠषीकेश मारुती उमाप (वय २९, रा. कावेरी पार्क, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ॠषीकेश आई-वडिलांबरोबर राहत होता. लॉकडाउनमध्ये त्याची कंपनी बंद पडली होती. नोकरी गेल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता.

सोमवारी रात्री तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. मंगळवारी सकाळी त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजा वाजविला. मात्र, दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. दरवाजा तोडण्यात आल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगात भाजप कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT