Industry 
पुणे

सहकारी बॅंकांमध्ये खाते असणारे उद्योजक अडचणीत; केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले पण...

सुधीर साबळे

पिंपरी - कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या लघुउद्योजकांना हात देण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंका वगळता सहकारी बॅंकांना हे पॅकेज देण्याचे अधिकार नाहीत. उद्योगनगरीमधील साठ टक्‍के उद्योजकांची बॅंक खाती ही सहकारी बॅंकांमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संकटामुळे लघुउद्योगांसाठी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचा फायदा हा राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये खाते असणाऱ्या उद्योजकांना होत आहे, त्यामुळे सहकारी बॅंकांमध्ये खाते असणारे उद्योजक अडचणीत सापडले आहेत. दोन महिन्यांपासून उत्पादनप्रक्रिया बंद होती, त्यामुळे कंपनीचे अर्थचक्रही ठप्प झाले होते. आता उद्योग सुरू झाले असले तरी जुन्या थकीत बिलांची रक्‍कम अद्याप आलेली नाही, त्यामध्ये काही जणांना मनुष्यबळाची अडचण भासत आहे.

त्यामुळे उद्योगाला पुन्हा गती देण्यासाठी तूर्तात बॅंकेकडून कर्ज घेऊन काम सुरू करावे लागणार आहे. बॅंकांकडे कर्ज घेण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही तारण काय ठेवता, अशी विचारणा होत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या उद्योजकांना कर्ज मिळविण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणारी आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना वेळप्रसंगी खासगी बॅंकांचा आधार घ्यावा लागत आहे.

११,५००  - पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योग
६,९०० - सहकारी बॅंकांतील खाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT