Kiran_Purandare
Kiran_Purandare 
पुणे

माणूस बदलला तरच निसर्ग बदलेल : किरण पुरंदरे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वीस वर्षांपूर्वी नागझिराच्या जंगलात साडे चारशे दिवस राहून या जंगलावर आधारित 'सखा नागझिरा' हे पुस्तक लिहिले. तेव्हा त्यांना स्थानिक नागरिक आणि आदिवासींची जंगलावरील निर्भरतेबाबत समजले. मात्र शहरात परतल्यानंतर पर्यावरण आणि जंगलाच्या संवर्धनासाठी काही उपक्रम आणि उपाय करण्याचे ठरविले. यासाठी कायमस्वरूपी या जंगलातील परिसरातच राहायचे म्हणून दोन ते तीन वर्षांपूर्वी पिटेझरे या गावात शहरी सोय सुविधांना सोडून सहकुटुंब ते राहू लागले. सध्या येथील स्थानिक आदिवासींना पर्यायी उत्पन्नाचे काम शिकवून त्यांची जंगलावरील निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पुण्यातील 59 वर्षीय पर्यावरण अभ्यासक किरण पुरंदरे यांनी जंगलांच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलले आहे. 

पिटझरे या गावातील गोंड आदिवासी मुले पूर्वी जंगलात आढळणाऱ्या पक्ष्यांची शिकार करत होते. मात्र आता त्यांना पक्षी वाचताना पाहिले जातंय. तर गोंड आदिवासी महिला आणि मुली स्वतः कापडी पिशव्या शिवून त्यावरील नक्षी काम करत उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्या या कापडी पिशव्या आता देशाबाहेरसुद्धा पोहोचत आहेत. तर मुलांना त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल यासाठी पुरंदरे दांपत्य या मुलांना वेगवेगळ्या कलांचे प्रशिक्षण देत आहेत. 

या अनोख्या कार्याबद्दल पुरंदरे म्हणाले, "निसर्ग संवर्धनाबाबत फक्त बोलण्यात येते. कित्येक मंडळी यासाठी माहिती कार्यशाळा किंवा परिषद आयोजित करतात. मात्र प्रत्यक्षात यावरील कृती करणाऱ्यांची संख्या कमी आहे. जेव्हा मी नागझिराच्या जंगलात राहिलो, तेव्हा निसर्गाशी खऱ्या अर्थाने नातं जोडलं. तसेच संवर्धनाच्या कार्यासाठी आपण काय भूमिका घेतली पाहिजे हे लक्षात आले आणि कायमस्वरूपी जंगलातच राहून जंगलाच्या संवर्धनाचे कार्य करत या स्थानिकांच्या मदतीने त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिकांना उत्पन्न मिळावे यासाठी फळभाज्यांची लागवड केली. 

"आपण म्हणजेच निसर्ग हा विचार मानव जातीने सर्वप्रथम खोडावा. निसर्गातील इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्य देखिल प्राणीच आहे. तसेच निसर्गाच्या विरोधात जाणाऱ्या प्रजाती या कायमच्या नष्ट होतात. लॉकडाऊनच्या काळात लोकांची रेलचेल थांबली परंतु, निसर्गावर याचा चांगला परिणाम घडताना दिसला. त्यामुळे निसर्गात मानवी हस्तक्षेप थांबल्याने पर्यावरण संवर्धन देखील शक्‍य होईल. 
- डॉ. वरद गिरी, पर्यावरणशास्त्रज्ञ 

"माणसाने निसर्गात भ्रमंती करणे नक्कीच गरजेचे आहे. त्यामुळे निसर्गाला कसे वाचवता येईल याबाबत खूप शिकायला मिळेल. परिणामी निसर्ग संवर्धन आणखीन सोपे होईल. तसेच निसर्ग पर्यटनाचे सर्व कायदे पाळून लोकांनी पर्यटन केले, तर निसर्गाची हानी नक्कीच कमी होईल.'' 
- अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT