bjp.jpg 
पुणे

सेवानिवृत्तीनंतरही 19 शिक्षकांना दोन महिने वेतन सुरू; पुण्यातील प्रकार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : निवृत्त झाल्यानंतरही एकोणीस शिक्षकांना तब्बल दोन महिने वेतन सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आला. त्यांची गांभीर्याने दखल घेत समितीने या गलथानपणास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे आदेश समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाला दिले. 

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 19 शिक्षक दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. यामध्ये मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. सेवानिवृत्तीच्यावेळी सर्व तपासण्या करून संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. त्यासाठी तीन- चार महिन्यांचा कालावधी घेतला जातो. मात्र, शिक्षण विभागाकडील परिस्थिती वेगळीच असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक महेंद्र पठारे यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना अद्यापही वेतन सुरू असल्याचे समितीच्या बैठकीत निदर्शनास आणले.

त्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनीही हा प्रकार झाल्याचे मान्य करीत संबंधित शिक्षकांना नोटिसा पाठवून दोन महिन्याच्या वेतनाची रक्कम तातडीने प्रशासनाकडे जमा करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच काही शिक्षकांनी रक्कम परतही केली असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले. 

दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत चौकशी करून अहवाल स्थायी समितीपुढे ठेवावा. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे हेमंत रासने यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT