Agriculture-Goods-Export 
पुणे

कोरोनाच्या काळात सोळा लाख मेट्रिक टन शेतमालाची निर्यात

प्रवीण डोके

पुणे - कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन केल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. परंतु, लॉकडाउन आणि अनेक गोष्टींवर निर्बंध असूनही राज्य कृषी पणन मंडळाने ४४ निर्यात सुविधा केंद्रांवरून विविध देशांत भरघोस कृषिमाल निर्यात केला. राज्यातून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल १६ लाखांहून अधिक मेट्रिक टन शेतमालाची निर्यात केली, तर ४८७८.९७ कोटी रुपयांचा माल निर्यात केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक व्यापार कराराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील फळे व भाजीपाल्यास परदेशी बाजारपेठेच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. राज्यातून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, कांदा, भाजीपाला (भेंडी, कारले, शेवगा, तोंडली, हिरवी मिरची) या कृषिमालाची निर्यात होते. पणन मंडळाने विशेष निर्यात कक्ष स्थापला असून त्यामार्फत राज्यातील शेतमालाची निर्यात सुरळीत करण्यासाठी मालाची उपलब्धता, इतर आनुषंगिक मालाची वाहतूक, जेएनपीटी येथून कंटेनरची उपलब्धता, फायटोप्रमाणपत्र उपलब्धता याबाबत निर्यातदार व निर्यातीशी संबंधित सर्व घटकांना मार्गदर्शन केल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. 

या देशात होतो शेतमाल निर्यात
अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, युरोपियन देश, नेदरलॅंड, रशिया, थायलंड, कॅनडा, न्यूझीलंड, यू. के., सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण व दुबई.

कोरोनाच्या काळात राज्यातून समाधानकारक निर्यात झाली. शेतकऱ्यांनी दाखवलेली जिद्द, पणनमंत्री व राज्यमंत्री यांनी दिलेली दिशा आणि पणन विभागाच्या प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने चोवीस तास सुरू ठेवलेल्या कंट्रोल रूम आणि सुसज्ज निर्यात सुविधा केंद्रांमुळे हे शक्‍य झाले.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT