Exposing army recruiting rackets with fake question papers
Exposing army recruiting rackets with fake question papers 
पुणे

बनावट प्रश्‍नपत्रिकांद्वारे आर्मी भरती करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बनावट प्रश्‍नपत्रिका तयार करुन 35 उमेदवारांना लष्कर भरतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळणाऱ्या खोट्या लष्करी भरती रॅकेटचा लष्कराचा गुप्तचर विभाग (लष्कराचे दक्षिण मुख्यालय) व कोल्हापुर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला. साताऱ्यातील एका नामांकीत करीअर ऍकॅडमीच्या मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये लष्करातील कोणाचा हात आहे का, याची कसून तपासणी केली जात आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणी तांत्रिक मदत केली.

अफझल कासम देवडेकर ऊर्फ सरकार, दिलावर हवालदार, अकीब सिकंदर हवालदार, रफिक पटेल व अरविंद लोंढे यांच्या विरुद्ध कोल्हापुरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. लष्करातील भरतीसाठी आवश्‍यक सामान्य प्रवेश परीक्षेसाठी (सीईई) बनावट प्रश्नपत्रिका विक्रीच्या आरोपावरून दिलावर हवालदार व अकीब हवालदार यांना कोल्हापूर लष्करी स्टेशन येथे पकडण्यात आले. 

धक्कादायक! वाईड बॉल टाकला म्हणून गोलंदाजाची डोक्यात बॅट घालून मैदानावरच हत्या

रविवारी (ता.19) कोल्हापूरच्या 109 टेरिटोरियल लष्करी मैदानावर सामान्य प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये दहावी, बारावीचे गुणपत्रक, आधारकार्ड, पॅनकार्ड सह 19 कागदपत्रांची आवश्‍यकता होती. कागदपत्रांच्या पुनर्प्राप्तीसाठी उम्मेदवारांची प्रारंभी चौकशी करण्यात आली. त्यावेळी नऊ जणांनी बनावट प्रश्‍नपत्रिका बाळगल्याचे निदर्शनास आले. साताऱ्यातील एका नामांकीत करीअर ऍकॅडमीच्या मालकाने नोकरीचे आमिष दाखवून, बनावट प्रश्‍नपत्रिका दिल्याचे उमेदवारांनी सांगितले. त्यावरुन लष्कराच्या गुप्तचर विभाग (लष्कराचे दक्षिण मुख्यालय) व कोल्हापुर पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. 

पाकिस्ताच्या 2800 जणांना भारतीय नागरिकत्व; केंद्र सरकारची माहिती

प्रकरणामध्ये संशयित आरोपींनी लष्कराच्या सामान्य प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे तीन ते चार लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी काही रक्कम त्यांनी स्विकारली. तसेच उमेदवारांना भविष्यात ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांची मुळ कागदपत्रेही त्यांच्याकडे ठेवून घेतली असल्याचे लष्करातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT