Extension of income tax till June 30 by PMC pune.jpg 
पुणे

पुणेकरांना दिलासा! मिळकत कर भरण्याससाठी 'या' तारखेपर्यंंत मिळाली मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे : मिळकत कर भरण्यासाठी आज (३१ मे) शेवटचा दिवस असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्यासाठी ही मुदत ३० जूनपर्यंत वाढण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहेत. यासाठीची स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभेची मान्यता देण्यात येईल, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

मिळकत कर भरण्यास एक महिन्याचा कालावधी मिळाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नव्हते. शिवाय शनिवारी ऑनलाईन भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय आहे.

शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

महापौर मोहोळ म्हणाले, 'लॉकडाऊनच्या काळात काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नाही. या संकटाच्या काळात पुणेकरांना दिलासा मिळावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत पुणेकरांनी ३०० कोटींच्या आसपास कर भरला आहे. गेल्या वर्षी कर भरणा करण्याकरिता ३१ मेपर्यंतची मुदत होती. गेल्या वर्षी ३१ मेपर्यंत ६५० कोटींचा कर जमा झाला होता. आता या मुदतवाढीने कर भरणा वाढण्यास मदतच मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होईल. या निर्णयासंदर्भात महापालिका पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशीही चर्चा झाली आहे'

पुण्यात हे काय चाललंय, रोज `एवढे` जण करताहेत आत्महत्या; ही आहेत कारणे...​​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT