पुणे

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोंदणीसाठी सरकारकडून मुदतवाढ

डी. के. वळसे पाटील

मंचर : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ता. 31 मार्च 2020 रोजी शेवटची मुदत असलेली नवीन नोंदणी, व नूतनीकरणासाठीची मुदत (ता. 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या निर्णयाचा फायदा हजारो अभियंत्यांना होणार आहे. शासकीय जीआर शासनाने  काढलेला आहे. या निर्णयाचा फायदा वीस ते पंचवीस हजार अभियंत्यांना होणार आहे, अशी माहिती राज्य स्थापत्य अभियंता  संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष दिलीप मेदगे यांनी दिली.

ते म्हणले, ''कोरोनाच्या काळामध्ये मार्चमध्येच लॉकडाउन सुरू झाल्यामुळे शेवटच्या क्षणी अनेक अभियंते नोंदणीपासून वंचित राहिले होते. अनेकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्याचे सचिव यांच्याकडे यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी ही मुदत किमान ३१ जुलै पर्यंत वाढून देण्यात यावी. अशी विनंती राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे महासचिव महावीर पाटील व मी सचिवांना केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अभ्यास समितीच्या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दोन्ही सचिव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे पुण्याचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.

शासकीय जीआर कमिटी अभ्यास समितिचा सदस्य म्हणून मी हजार होतो. मुदत ता.३१  मार्च २०२१ पर्यंत वाढवावी. अशी विनंती केली होती. सचिव देबडवार यांनी  मुदतवाढ देण्याचे सरकारने मान्य केले आहे. असे आश्वासित केले होते. व त्याबाबत शासकीय आदेश प्राप्त झाला आहे. यापुढे शासन अशी मुदतवाढ देणार नाही.  सर्व अभियंत्यांनी ता.३१  मार्च २०२१ च्या पूर्वी नोंदणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करून घ्यावी. देबडवार साळुंके ,उपसचिव . राजेंद्र जवंजाळ ,  सचिन चिवटे ,जीआर अभ्यास समितीचे सदस्य किरण ढोकणे यांची याकामी मदत मिळाली”. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

SCROLL FOR NEXT