Crime
Crime 
पुणे

चिंचवडमध्ये खंडणीखोर महिलेला अटक

संदीप घिसे

पिंपरी - मारहाण आणि शिवीगाळीची तक्रार मागे घेण्यासाठी चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी दुपारी चिंचवड स्टेशन येथे घडली.

अनिता संजय भापकर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप लक्ष्मण शेडगे (वय 38, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक अन्सार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेडगे हे मोहननगर, चिंचवड येथील सुमीत प्रा. लि. या कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून कामाला होते. त्यावेळी तिथे साफसफाईचे काम करणाऱ्या अनिता या चोरी करीत असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक अर्जुन कांबळे यांना शेडगे यांनी दिली. यामुळे अनिता यांना कामावरून काढून टाकले. याचा राग अनिता यांच्या मनात होता.

28 ऑक्‍टोबर रोजी शेडगे हे काही कामानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथे गेले होते. त्यावेळी अनिता हिने शेडगे याने आपल्याला आनंदनगर, चिंचवड येथे मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार चिंचवड पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर शनिवारी (ता. 24) दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेडगे हे चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात असताना त्यांना अनिता यांनी फोन केला. चार हजार रुपये मला दिल्यास तुझ्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेते, असे म्हणत खंडणीची मागणी केली. शेडगे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या सूचनेनुसार फिर्यादी यांनी आरोपी अनिता हिला पैसे नेण्यासाठी बोलविले. ती पैसे नेण्यासाठी आली असता पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली. सदरचा गुन्हा आणि आरोपी पिंपरी पोलिसांनी चिंचवड पोलिसांकडे वर्ग केला असून सहायक निरीक्षक शेवाळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT