Fadnavis has nothing left to guess said Industry Minister Subhash Desai  
पुणे

अंदाजाशिवाय फडणवीसांकडे काही उरलं नाही; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा टोला

सकाळवृत्तसेवा

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना पुढील चार वर्षे स्वप्नच बघत राहावे लागेल. महाविकास आघाडीचे सरकार आपली पाच वर्षांची मुदत पूर्ण करणार आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या हातात अंदाज व्यक्त करण्याखेरीज आता काही नाही, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज लगावला.

राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार  

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदासाठी निवडणूक होणार आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन लोटसचे संकेत दिले आहेत. त्यावर येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देसार्इ यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आमचे महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार स्थिर झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेने वाढता विश्वास दाखविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांची आपली मुदत पूर्ण करेल,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अखेर कात्रज-स्वारगेट बीआरटीमार्गावर धावली बस; पाहा व्हिडिओ

नाना पटोले यांच्या राजीनाम्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. मात्र ते आणखी काही काळ विधानसभा अध्यक्ष म्हणून लाभले असते तर बरे झाले असते. परंतु, त्यांचा पक्षांतर्गत विचार असल्यामुळे दुसऱ्या पदावर जाण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. आमच्या नाना पटोले यांना खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही पदावर गेले तरी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही देसाई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake RTO Website: अवघ्या सात रुपयांमध्ये डुप्लिकेट आरसी बुक! आरटीओच्या बनावट वेबसाइट प्रकरणातील धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण’ योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Supreme Court : मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संपत्तीत हिस्सा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टानेही वडिलांची दिली साथ; नेमकं काय घडलं?

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

SCROLL FOR NEXT