Crime1.jpg 
पुणे

तरुणीला पळवून नेण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबियांना मारहाण

सकाळवृत्तसेवा

मंचर (पुणे) : २१ वर्षाच्या तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत तिला घरातून पळवून नेत असताना विरोध करणाऱ्या तिच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. ही घटना रांजणी – कारफाटा  (ता. आंबेगाव) येथे रविवारी  (ता. १६) रात्री घडली आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी चार जणांच्या  विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

आकाश संजय उबाळे, धनंजय वाघ (दोघे रा. उबाळमळा रांजणी ता. आंबेगाव) मयूर संजय विटकर, रोहित मदत कुरमे (दोघे रा. पिंपरी पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अक्टीव्हा (एमएच १४ एच. व्ही.६३३६) व मोटारसायकल (एमएच १२ डी. के ८१९७) या दुचाकी वाहनाद्वारे पिडीत तरुणीच्या घरासमोर आरोपी आले. आकाश उबाळे तरुणीच्या घरात गेला. ” मला तू आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे म्हणून तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन केले.

तिचा हात पकडून बाहेर घेऊन जात होता. तरुणीची सुटका करण्यासाठी तिचे आई, वडील, आजी,चुलते आले असता त्यानांही धक्काबुक्की व मारहाण केली. मारहाणीमुळे चुलत्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक ईश्वर कदम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT