Narayangaon Farmers strike
Narayangaon Farmers strike 
पुणे

टोमॅटो खरेदीवरून नारायणगावमध्ये शेतकरी-व्यापार्‍यांमध्ये वाद

सकाळवृत्तसेवा

नारायणगाव : शेतकरी संपाबाबत शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याने किसान क्रांती संघटनेने संप मिटल्याचे जाहीर करुनही आज सलग तिसऱ्या दिवशी नारायणगाव येथील टोमॅटो व मेथी, कोंथबिरीचे लिलाव बंद ठेवण्यात आले. संप मिटल्याचे जाहीर झाल्याने आज शेतकऱ्यांनी येथील उपबाजारात टोमॅटो विक्रीसाठी आणले. मात्र व्यापाऱ्यांनी खरेदी करण्यास नकार दिल्याने टोमॅटो उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे उपबाजारात तणाव निर्माण झाला होता.

एक जूनपासून शेतकरी संपावर गेल्याने गेले दोन दिवस जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव, आळेफाटा, ओतूर येथील फळ, भाजीपाल्याचे उपबाजार बंद ठेवले होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर किसान क्रांती संघटनेने संप मिटल्याचे जाहीर केले होते. यामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील टोमॅटो उत्पादकांनी आज सकाळपासूनच टोमॅटोची तोडणी करण्यास सुरवात केली. आज दुपारी बारानंतर उत्पादकांनी टोमॅटोचे क्रेट येथील उपबाजारात विक्रीसाठी आणले होते. टोमॅटो खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे आग्रह धरला. मात्र व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी करण्यास नकार दिला.

सहायक पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, बाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख यांनी व्यापारी व शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी न करण्याची भूमिका घेतल्याने शेतकरी टोमॅटो घेऊन माघारी गेले. यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

शेतकरी संघटनांच्या दुटप्पी भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत व्यापारी जालिंदर थोरवे, सारंग घोलप, किसन कुतळ म्हणाले, ''31 मे रोजी खरेदी केलेले तीन हजार क्रेट टोमॅटो फेकून दिले. टोमॅटोच्या गाड्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून क्रेटसह टोमॅटो रस्त्यावर टाकून दिल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकरी संप मिटल्याबाबत अजूनही शेतकरी संघटनांमध्ये एकवाक्‍यता नाही. महामार्गावर काही शेतकरी संघटनांच्या वतीने शेतमालाचे ट्रक अडवले जात आहेत. यामुळे टोमॅटोची वाहतूक करायला ट्रक चालक व मालक तयार नाहीत. नुकसान टाळण्यासाठी वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोमॅटोसह इतर भाजीपाला खरेदी न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.``

सहायक पोलिस निरीक्षक मुजावर यांनी आज येथील स्थानिक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतमाल व दूध वाहतूक करणाऱ्या मालट्रक अडवल्यास कारवाई करण्याचा इशारा मुजावर यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT