Farming work  esakal
पुणे

अवकाळी पावसामुळे शेतीची कामे रखडली; आंब्याचेही मोठं नुकसान

भात लावणी पूर्व शेतातील नांगरणी, बांधाना शिग देणे, रोपटे तयार करणे, जमिनीचे सपाटीकरण अशी मशागतीची कामे रखडली आहेत.

सकाळ टीम

मुळशी तालुक्यात (Mulshi) पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) शेतीची मशागतीची कामे रखडली आहेत. तसेच जोरदार वारे वाहिल्यामुळे आंबे (Mango) पडून नुकसान झाले आहे. तालुक्यात गेली पंधरा दिवसात कधी गारांचा तर कधी जोरदार वारेसह अवकाळी पाऊस पडत आहे. तालुक्यातील पश्चिम भाग डोंगर उतारावर वसलेला आहे. पावसामुळे उतारावरील खाचरांत पाणी तुंबून ओल कायम राहत आहे. भात लावणी पूर्व शेतातील नांगरणी, बांधाना शिग देणे, रोपटे तयार करणे, जमिनीचे सपाटीकरण अशी मशागतीची कामे रखडली आहेत.

सध्या शेतीची कामे ट्रँक्टर, जेसिपी यांनी केली जातात. खाचरातून ट्रँक्टर जाऊ शकत नाही, खाचरे वाफस्यावर नसणे यामुळे शेतीची मशागत होऊ शकत नाही. मान्सून एक महिन्यावर आला आहे. त्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे होण्यासाठी पाऊस उघडण्याची गरज आहे.

तसेच जोरदार वारे यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडावरील आंबे पडून शेतकरींचे नुकसान झाले आहे. तसेच गारांच्यामुळे आंबा फळाचे नुकसान झाले आहे. यावर्षी मोहोर चांगला आला होता. त्यावेळी ढगाळ वातारण व पावसामुळे मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून गेला होता. त्यातूनही आलेल्या फळांचे पावसाने सध्या नुकसान होत आहे. तालुक्यात आंब्याचे उत्पन्न शेतकरींना मोठा आर्थिक आधार आसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vagdevi idol: १५० वर्षांपूर्वी इंग्लंडला गेलेली वाग्देवी मूर्ती पुन्हा भारतात येणार?, वाग्देवीची मूर्ती कोहिनूरपेक्षाही मोलाची..

Horoscope : आजपासून बदलणार 4 राशींचं नशीब ! नव्या नोकरीने सुरु होणार सुवर्णकाळ; फक्त पैसाच नाही प्रॉपर्टीही मिळणार

Chemists Strike India : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, १५ लाखांहून अधिक मेडिकल्स बंद राहणार; महाराष्ट्रात काय असेल स्थिती? जाणून घ्या

El Nino Monsoon: ‘एल निनो’ रोखणार मॉन्सूनची वाटचाल; पर्जन्यमान घटणार, कृषीला फटका शक्य..

सोलापूर शहरात चोऱ्या- घरफोड्या! पोलिस म्हणतात, नागरिकांनी ‘या’ ११ सूचना पाळल्यास कधीच होणार नाही चोरी; डायल ११२ अन्‌ १९३० हे क्रमांक सेव्ह करुन ठेवा

SCROLL FOR NEXT