A female bus conductor was killed in accident of tanker and Two wheeler at phursungi pune 
पुणे

पुण्यात टँकरच्या धडकेत महिला कंडक्टरने गमावला जीव, दोन मुलांसह पती जखमी

migrator

पुणे ः सुट्टीमुळे भोरलामधील गावी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव पेट्रोल टँकरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यु झाला. तर पती व दोन मुले जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी सकाळी साडे सात वाजता फुरसुंगी उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालकास अटक केली. 

लक्ष्मी प्रमोद मालुसरे (वय 32, रा. गोंधळेनगर, हडपसर ) असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती प्रमोद मालुसरे (वय 38) व त्यांची दोन मुले जखमी झाले आहेत. मालुसरे दापत्य पीएमपी बस कंडक्‍टर असून ते हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात राहाता. त्यांना दोन मुले आहेत.

''श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल'' : स्वामी गोविंददेव महाराज​

नववर्षानिमित्त सुट्टी घेऊन ते गुरूवारी सकाळी भोर येथील त्यांच्या दुचाकीवरुन गावी जात होते. प्रमोद मालुसरे दुचाकी चालवित होते, त्यांच्या पाठीमागे दोन्ही मुले व पत्नी लक्ष्मी या बसलेल्या होत्या. त्यांची दुचाकी फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर पोचली. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या पेट्रोलच्या टॅंकरने मालुसरे दाम्पत्याच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरुन लक्ष्मी मालुसरे या खाली पडल्या. त्या टॅंकरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने चेंगरून त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर दुचाकीवरुन खाली पडलेल्या प्रमोद मालुसरे व त्यांची दोन्ही मुले चे पाठीमागील चाक वरून खाली पडलेल्या लक्ष्मी ट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात प्रमोद मालुसरे आणि त्यांची दोन किरकोळ जखमी झाली आहेत. या अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलिस तत्काळ 

"सुट्टीनिमित्त मालुसरे दाम्पत्य गावी जात होते. त्यांच्या दुचाकीला टॅंकरने धडक दिल्यामुळे महिला कंडक्‍टर लक्ष्मी मालुसरे यांचा मृत्यु झाला. तर पती व मुले जखमी झाली आहेत. टॅंकर चालकास अटक केली आहे.''
- बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT