festival of Makar Sankranti is celebrated in a traditional manner 
पुणे

नऊ महिन्यांनी मैत्रिणींना भेटून मकर संक्रांत उत्साहात साजरा

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नऊ महिन्यांनी आपापल्या मैत्रिणींना भेटून शहरात मकर संक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. सुवासिनी महिलांनी एकमेकींना वाण दिले. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमधील मंदिरे महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती. एकमेकांना तिळगूळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या सर्वांत महिलांनी कोरोनाविषयक खबरदारी घेतली असल्याचे पाहायला मिळाले. 

बाजारात तिळगुळाबरोबर वाणाच्या साहित्याची विक्री झाली. बोर-तिळाचे लाडू, सुगडे पूजन एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करताना प्रत्येकीच्या चेहऱ्यावर हसू फुललेले. तसेच मकर संक्रांतीसाठी लागणारे वाण, वस्तूंचे स्टॉल्स मुख्य बाजारपेठेसह विविध भागांत लावण्यात आले. हळदी-कुंकुसह विविध वाण खरेदीसाठी बाजारपेठेत काहीशी गर्दी झाली होती. 

घराजवळील मंदिरांमध्ये जाऊन सुवासिनींनी सुगड्यांची पूजा केली. तर, घरोघरी लहान मुलांना बोरन्हाण आणि नववधूंना हलव्याचे दागिने घालून सण आनंदाने साजरा केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: मोठी बातमी! मुलांच्या बालपणी पालकांनी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Yuzvendra Chahal: माँ कसम खाओ... चहलची पोस्ट व्हायरल; धनश्रीवर साधला निशाणा

Central Railway: दिवाळी संपली तरीही गिफ्टचा धडाका सुरूच! आणखी विशेष गाड्यांची घोषणा; रेल्वेचा मोठा निर्णय

फक्त मराठीत नाही तर या प्राचीन भाषेतही रिलीज झाला अभंग तुकाराम सिनेमाचा टीझर !

Phaltan Doctor Case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन; फरार आरोपींचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT