cri.jpg 
पुणे

...अन् भावानेच नात्याला काळिमा फासला

सकाळवृत्तसेवा

मंचर :  भाऊ-बहिणीच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या नात्याला कलंक लावणारी घटना मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली. चुलत भावानेच बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. सदर तरुणीने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल करून ताबडतोब त्याला अटक केली आहे.

शेतीच्या कारणावरून आरोपी हा दारू पिऊन नेहमी शिवीगाळ व दमदाटी करत होता. मंचर येथे सदर तरुणी एकटी असताना आरोपी घरी आला. त्याला पिण्याचे पाणी आणण्यासाठी सदर तरुणी किचनमधील गेली. त्यावेळी आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

त्यावेळी तरुणी म्हणाली” तु माझा भाऊ आहेस तु हे काय करतो आहेस.” त्यानंतर आरोपीने तिला लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सदर आरोपीने बहिणीला जिवे मारून टाकण्याची धमकीही दिली. फिर्यादीवर सध्या मंचर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मंचर पोलिस पुढील तपास करत आहेत.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT