Filed a case against a police officer for demanding physical relation with Criminal sister  
पुणे

धक्कादायक! मदतीच्या बहाण्याने पोलिसाने केली शरीर संबंधांची मागणी; पुण्यात गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे : अटक केलेल्या आरोपीला मदत करण्याचा बहाणा करुन एका पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीच्या बहिणीकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसाविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार दादाराम ताकमोडे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताकमोडे हा शिवाजीनगर पोलिस मुख्यलयात नेमणुकीस आहे. तर फिर्यादी तरुणीच्या भावाविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यास अटक करण्यात आली आहे. तर त्यास बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

खोपोली नजीक द्रुतगतीवर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, ताकमोडे याने फिर्यादीच्या भावाला मदत करण्याचा बहाणा करुन फिर्यादीशी ओळख वाढविली. त्यानंतर फिर्यादीचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी सातत्याने बोलणे वाढविले. त्यानंतर 24 डिसेंबर 2020 या दिवशी लग्नासाठी पाहुणे दाखविण्याचा बहाणा करुन तिला एका लॉजवर नेले. तेथे फिर्यादीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीने बंदगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींनी ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी 'पीएम-किसान' योजनेचा २२ वा हप्ता जारी केला

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT