Film Screening has been Canceled a day before at FTII 
पुणे

FTII मधील PIFF चे चित्रपट प्रदर्शन रद्द कारण...

सकाळ वृत्तसेवा

पुण : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत (पिफ) दाखविण्यात येणारे चित्रपट विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे तेथे दाखविण्यात येणार नाहीत. हे सर्व 28 चित्रपट कोथरूड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखविले जाणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पिफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल याबाबत सकाळशी बोलताना म्हणाले, "चित्रपट महोत्सवाची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. त्याचे नियोजन करताना एफटीआयआयच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार तेथे रिट्रोस्पेक्‍टिव्ह श्रेणीतील 28 चित्रपट दाखविण्यात येणार होते. त्याचे वेळापत्रकही निश्‍चित करण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळात तेथील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे प्रदर्शनावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून हे चित्रपट तेथे दाखविले जाणार नाहीत.'' 

गोट्या, लगोर, सुरपाट्या खेळायचंय, चला बारामतीत

"कोथरूड येथील चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात या चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. एफटीआयआयमध्ये प्रदर्शन होणार नसले, तरी चित्रपटांची संख्या कमी करण्यात आलेली नाही. कार्यशाळांसह अन्य कोणत्याही नियोजनात बदल केलेला नाही. एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे तेथे ऐनवेळी बदल करावा लागला. विद्यार्थी आंदोलन करीत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. यामुळे चित्रपट महोत्सवात अडथळा नको म्हणून हा बदल केला आहे.'' 

पिंपरीत सिमेंट काँक्रीटचा ब्लॉक डोक्‍यात मारून एकाचा खून 

पुणे फिल्म फाऊंडेशनचे सचिव रवी गुप्ता म्हणाले, "एफटीआयआयमध्ये यापूर्वी पिफचे चित्रपट दाखविले जात नव्हते. यावर्षी तेथे दाखविण्यात येणार होते. परंतु विद्यार्थ्यांची आंदोलन सुरू केले. त्यांच्या अधिकाराचा मान आम्ही ठेवला आहे. तसेच या आंदोलनामुळे महोत्सवात येणाऱ्या मान्यवरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून तेथे दाखविण्यात येणारे चित्रपट आम्ही कोथरूड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखविणार आहोत.''   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT