An under-construction building collapsed in Yerwada, Pune
An under-construction building collapsed in Yerwada, Pune Sakal Digital
पुणे

पुणे इमारत दुर्घटना : अखेर बिल्डर, कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील येरवडा भागात निर्माणाधीन इमारत कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला होता. या बिल्डिंगचा स्लॅब पडल्याने दुर्घटना घडली. रात्रीच्या वेळी हा प्रकार झाल्याने मदत पोहोचण्यासही उशीर झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृत मजुरांप्रती शोक व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्याची मागणी होत आहे. (Pune Building Collapse)

या प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ सूत्र हालवत बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार, पर्यवेक्षक, सुरक्षा अभियंता आणि बांधकाम साइटशी संबंधित काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४, ३३६, ३३७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. ब्लू ग्रास बिजनेस पार्क कन्स्ट्रक्शन साईटचे अनंता कंपनी,कॉन्ट्रॅक्टर अहलुवालीय कॉन्ट्रॅक्टर प्रा.लि कंपनीचे मालक मोहन अचलकर व बांधकाम संबंधित इतर पदाधिकारी, एमसीपीएल कंपनीचे लेबर सुपरवायजर शरीफ तसेच सीएनब्ल्यू कंपनीचे सेफ्टी सुपरवायजर सतीश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कामादरम्यान कामगारांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही त्याच्या कृती मुळे फिर्यादी व त्याच्या सोबत असणारे अनेक कामगार गंभीररित्या जखमी होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या कामगारांची नावे सोहेल मोहम्मद वय २२,मोहम्मद समीर वय ३०,मोबिद आलम वय ४०,मजरूम हुसेन वय ३५,तकाजी आलम वय ४०. तसेच जखमींची नावे मोहम्मद आलम मो इब्राहीम,मोहम्मद फईम मो कुरवान,मोहम्मद रफिक आलम,मोहम्मद साहिल मुस्लीम असे आहेत.

स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्लॅबचा ढिगारा आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

शास्त्रीनगर चौकतील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व जवानांनी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : काश्मीरमधील 4 दहशतवादाशी संबंधित मालमत्ता जप्त

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

Prajakta Mali : अखेर सही झाली! प्राजक्ता माळीच्या आयुष्यात घडतंय काय? म्हणते "आयुष्यातील सर्वात..."

SCROLL FOR NEXT