Corona  
पुणे

खेडमध्ये आढळला पहिला कोरोना रुग्ण, पदाधिकाऱ्याने केली अशी चूक... 

राजेंद्र सांडभोर

राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगरजवळील राक्षेवाडी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, त्याला सध्या पुणे येथील जहॉंगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या दोन अडीच महिन्यांपासून कोरोनामुक्त राहिलेल्या खेड तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित सापडल्याने तालुक्‍यात आणि विशेषतः राजगुरुनगरमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, एका जबाबदार पदाधिकाऱ्याकडून या रुग्णाच्या नावासह सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल झाल्याने सगळीकडे त्याची ओळख पसरली आहे. 

राक्षेवाडी (ता. खेड) येथील एका गृहप्रकल्पाच्या इमारतीत हा रुग्ण राहत असून, तो पुणे येथे एका मोठ्या रुग्णालयातील कर्मचारी आहे. तो पुण्याहून राजगुरुनगरला अधूनमधून येऊनजाऊन काम करीत होता. त्यानंतर त्याला आजारी वाटू लागल्याने राक्षेवाडी परिसरातील एका दवाखान्यात 11 मे रोजी उपचार घेतले होते. मात्र, बरे न वाटल्याने त्याला दोन- तीन दिवसांपूर्वी जहॉंगीर रुग्णालयात दाखल झाले.

काल (ता. 14) रात्री उशिरा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तालुका प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि तपासणी करणारे डॉक्‍टर, अशा त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या नऊ- दहाजणांना पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राक्षेवाडी ही राजगुरुनगर नगरपरिषदेलगत आहे. त्यामुळे हा रुग्ण आढळल्याने लोकांना आणि प्रशासनालाही धक्का बसला आहे. प्रशासनाने राक्षेवाडी परिसर सील करण्यास सुरुवात केली असून, दुकाने बंद करण्यात आली आहेत. आपल्या परिसरात रुग्ण सापडल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, स्वयंशिस्त पाळावी व अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT