Jica 
पुणे

आधी जागा, नंतर निविदा प्रक्रिया; जलशक्ती मंत्रालयाचे महापालिकेला पत्र

सकाळवृत्तसेवा

पुणे - शंभर टक्के जागा ताब्यात असल्याशिवाय निविदा काढू नका, अशा शब्दात पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने पुणे महापालिकेला पत्र पाठवून आठवण करून दिली आहे. दरम्यान, ११ ठिकाणांपैकी पाच ठिकाणच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठीच्या जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जायका प्रकल्पांतर्गत शहरात अकरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेकडून फेरनिविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीचे इस्टिमेट तयार होऊन त्यास प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे. असे असताना केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे उपसंचालक एस. के. सिंग यांनी दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवून संपूर्ण प्रकल्पासाठीची जागा ताब्यात आल्याशिवाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.

त्यासाठी १५ डिसेंबर २०२० रोजी महापालिका, जलशक्ती मंत्रालय आणि जायका यांच्या एकत्रित बैठक झाली होती. या बैठकीचा संदर्भ देत सिंग यांनी महापालिकेला हे पत्र पाठविले असून त्यांची प्रत सकाळकडे उपलब्ध झाली आहे.

अशी आहे स्थिती

  • महापालिकेकडून ११ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प. 
  • त्यापैकी बाणेर, वारजे, बॉटेनिकल गार्डन, धानोरी आणि खराडी येथील शंभर टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत
  • त्यापैकी काही प्रकल्पांच्या जागा अंतिम टप्प्यात आहेत
  • महापालिकेकडून निविदा मागविण्याची तयारी 
  • जलशक्ती मंत्रालयाकडून आलेल्या पत्रामुळे प्रशासन पुन्हा अडचणीत

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT