b.t. kawade road.jpg
b.t. kawade road.jpg 
पुणे

पुण्यातील 'हा' भाग करण्यात येणार सील

सकाळवृत्तसेवा

घोरपडी (पुणे) : बी. टी. कवडे रस्ता व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण बी. टी. कवडे रस्ता व परिसर सील करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज असे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार हा परिसर २६ जून पासून ३० पर्यंत पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. बुधवारी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार बी. टी. कवडे रस्ता व परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये भारत फोर्स कंपनी ते भीमनगर परिसर, श्रीनाथ नगर, बालाजी नगर, फैलवाली चाळ, विकासनगर, पंचशील नगर, संपूर्ण बी. टी. कवडे रस्ता आणि घोरपडी गावातील मनपाच्या हद्दीतील परिसर पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

या दरम्यान फक्त दूध विक्री, मेडिकल आणि दवाखाने सुरू राहतील. सकाळी सात ते नऊ पर्यंत दूध विक्री करता येईल. मेडिकल व दवाखाना सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मंगळवारी साखर आयुक्त सौरभ राव आणि इतर अधिकारी यांनी या परिसराची पाहणी केली. त्यानुसार परिसरात नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे लक्षात आल्यावर संपूर्ण परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांच्या सूचनेनुसार पाच दिवस संपूर्ण परिसर सील करण्यात येणार आहे. नागरिकांना गरजेच्या वस्तू व साहित्य खरेदी करण्यासाठी दोन दिवस देण्यात आले आहेत. त्यानुसार नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी भाजीपाला, फळे  आणि किराणा समान याची खरेदी करून ठेवावी.

-दयानंद सोनकांबळे, सह आयुक्त, ढोले क्षेत्रीय कार्यालय 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT