Car Accident Lonavala
Car Accident Lonavala e sakal
पुणे

कार-कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ल्याजवळील शिलाटणे येथे आज (रविवारी) सकाळी भरधाव कार व कंटेनर (Car Accident Lonavala) यांच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत हे मीरा भाईंदर येथील एकाच परिवारातील असल्याची माहिती मिळत असून त्यांची नावे निष्पन्न होत आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारच्या (एचआर २६ सीके ७८०५) चालकाचे कार्लाफाटा सोडल्यानंतर गाडीवरील ताबा सुटल्याने कार दुभाजक तोडत विरुद्ध बाजूने येणाऱ्या कंटेनरला (एमएच ४३ वाय ५१३०) धडकली. कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक एवढी भीषण होती की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस, महामार्ग पोलिस, आयआरबी कर्मचारी, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्त यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT