Five hours of traffic jams administration negligence Complainant-police argument
Five hours of traffic jams administration negligence Complainant-police argument sakal
पुणे

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीत पाच तास गेले; तक्रारदार-पोलीसांत वादावादी

निलेश बोरुडे

किरकटवाडी: "लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या आनंदाने पत्नीसह पानशेत धरण परिसरात गेलो होतो. येताना सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाट्यापासून खडकवासला धरणापर्यंत येण्यासाठी माझे पाच तास गेले. वाहतूक कोंडी झालेली असताना केवळ दोनच पोलीस त्याठिकाणी दिसले. हजारो वाहने अडकलेली असताना केवळ दोन पोलीस काय करणार? मला या विरोधात तक्रार दाखल करायची आहे, परंतु पोलीस तक्रार घेता येत नाही असे बोलत आहेत. असे असेल तर मी नियम पाळतो, वेळेवर टॅक्स भरतो हा माझा गुन्हा आहे असे मला वाटते. जर प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकत नसेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा," असे म्हणत व्यावसायिक संदिप नहार हे संताप व्यक्त करत होते.

वैद्यकीय क्षेत्रात व्यवसाय करणारे संदिप नहार व त्यांची पत्नी मनिषा नहार हे आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त सकाळी पानशेत परिसरात गेले होते. लग्नाचा वाढदिवस साजरा करुन दुपारी नहार आपल्या चारचाकी वाहनाने पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले. रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंहगड व पानशेत परिसरात आले होते. खडकवासला चौपाटी परिसरातही पर्यटकांची तुडुंब गर्दी होती. परिणामी डोणजे फाट्यापासूनच नहार वाहतूक कोंडीत अडकले. पाच तास वाहतूक कोंडीत अडकल्याने व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस दिसत नसल्याने संदिप नहार हे तीव्र संताप व्यक्त करत होते.

पुढे बोलताना संदिप नहार म्हणाले की," वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर मी 100 नंबर वर फोन केला. त्यांनी 112 नंबर वर फोन करण्यास सांगितले. त्यानुसार त्यावर फोन करून तक्रार केली. ते पोलीस येतील असे म्हटले परंतु कोणीही आले नाही. खडकवासला चौपाटीवर दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त वाहने उभी होती. त्यांच्यावर का कारवाई करण्यात येत नाही. पोलीस होते असे सांगण्यात येत आहे तर दोघेच दिसत होते, इतर कोठे होते? माझा वेळ गेला आहे. माझी तक्रार घेतल्याशिवाय मी हवेली पोलीस स्टेशन सोडणार नाही."

"वाहतूक कोंडीत अडकल्याने संदिप नहार हे संतप्त झाल्याचे दिसत आहे. त्यांची तक्रार कोणाविरुद्ध घेणार असा प्रश्न आहे मात्र यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी परिसरात दर शनिवार व रविवारी अधिकचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाटी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येणार आहे." तेगबीरसिंह संधु, प्रभारी अधिकारी(भा.पो.से.), हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT