Five nurses of Naidu Hospital are infected with corona Virus
Five nurses of Naidu Hospital are infected with corona Virus 
पुणे

धक्कादायक! नायडू हास्पिटलच्या 5 नर्स कोरोनाबाधित

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर सलग दोन महिने उपचार करावे लागल्यामुळे नायडू सांसर्गिक रुग्णालयातील पाच परिचारिका कोरोनाची लागन झाल्याचे उघडकीस आले आहे. उपचार करताना राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन प्रशासन करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाचे सुमारे 150 रुग्ण असलेल्या नायडू रुग्णालयात महापालिकेच्या सेवेतील कायम आणि कंत्राटी सुमारे 35 तर, अन्य विभागांतून आलेल्या 35 परिचारिका आहेत. त्यातील 57, 42, 38, 36 आणि 35 वर्षांच्या पाच परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्यांना नायडूमध्येच ठेवण्यात आले आहे. त्यातील सोनावणे रुग्णालयातीलही एक परिचारिका तेथे होती. परंतु, त्यांना नुकतेच एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पाचही परिचारीकांची प्रकृती सुदैवाने सुधारत आहे.

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱया परिचारिका आणि डॉक्टरांना सात दिवस कोरोना वॉर्ड, सात दिवस नॉन कोरोना वॉर्ड आणि सात दिवस होम क्वारंटाईन करायचे, असा राज्य सरकारचा आदेश आहे. मात्र, त्याचे नायडू रुग्णालयात पालन होत नसल्याचे डॉक्टर आणि परिचारिकांचे म्हणणे आहे. या बाबत त्यांनी रुग्णालय अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते यांच्याकडे पत्रही दिले आहे. त्यात आम्ही 27 जानेवारीपासून सलग काम करीत आहोत. आमच्यापैकी काहीजण मधुमेही असून त्यांना रक्तदाबही आहे. त्यामुळे रोटेशन, सुट्या आवश्यक आहे, असे स्पष्ट म्हटले आहे. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. सलग ड्यूटी दिल्यामुळेच आम्हाला कोरोना झाल्याचे परिचारिकांनी सकाळशी बोलताना सांगितले. नायडूमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी अडीच, दुपारी दीड ते रात्री साडेआठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ, अशा शिफ्ट आहेत. नायडूमध्ये तळ मजलल्यावर आेपीडी आहे. पहिल्या मजल्यावर संशयितांची तपासणी होते तर दुसऱया, तिचऱया आणि चौथ्या मजल्यावर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर झिटिव्ह रुग्णांवर उपचार होतात. तेथे काम करणाऱया पाच परिचारिका गेल्या दहा दिवसांत पॉझिटिव्ह झाल्या आहेत.

ऐकलतं का? आळंदीत लावले जातेय चोरून लग्न

निवासाची व्यवस्था नाहीच
कोरोना रुग्णालयात काम करणाऱया डॉक्टर आणि परिचारिकांच्या निवासाची व्यवस्था त्याच रुग्णालयाच्या आवारात किंवा नजीकच्या ठिकाणी करायची, असा ही आदेश राज्य सरकराने दिला आहे. त्यानुसार तेथील बारा डॉक्टरांनी निवासाची व्यवस्था करण्याची मागणी केल्यावर त्यांना जुन्या विश्रामगृहातील चार खोल्या राहण्यास दिल्या. परंतु, तेथे सुविधा नसल्यामुळे डॉक्टरांनी तेथे राहण्यास नकार दिला. सध्या तेथे एकच डॉक्टर राहत आहे. महापालिकेने काही हॉटेल्स ताब्यात घेतली आहेत. तेथे डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हॉटेलच्या खोल्या डॉक्टरांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे रोजची ड्यूटी संपवून डॉक्टर आणि परिचारिकांना घरी  जावे लागत आहे.

पुणेकरांनो, मार्केट यार्डातील भुसार बाजाराबाबत महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर
घरच्यांना आमची काळजी
पॉझिटिव्ह झालेल्या परिचारिकांपैकी एकजण म्हणाल्या, सलग दोन महिने कोरोना वॉर्डात आम्हाला ड्यूटी देण्यात आली. एका वॉर्डमध्ये 30 ते 36 पेशंट असतात. तेथे किमान 5 परिचारिका हव्यात. परंतु, दोन किंवा तीन परिचारिकांवर जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे आमची धावपळ होते आणि त्या धावपळीतच काही तरी
चूक होते अन ती भोवते.

पुणे विद्यापीठ परीक्षा कशी घेणार यावर शिक्कामोर्तब का?
आम्ही पॉझिटिव्ह झाल्यावर आमच्या घरच्यांची तपासणी केली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्यांना गावाकडे पाठविले आहे. त्यामुळे आमचे त्यांच्या बोलणे फक्त फोन किंवा व्हिडीआे कॉलवर ते.बोलतात. त्यांना आमची सतत काळजी वाटते. आमच्या मुला-मुलींना आम्हाला भेटायला यायचे आहे. परंतु, आम्ही त्यांना येथे येऊ देत नाहीत. त्यामुळे आम्ही पाचजणीच आमची परस्परांची काळजी घेतो, असे एका परिचारिकेने सांगितले.

पुणेकरांनो, घरातच बसा...सूर्य ओकतोय आग 

यातील तीन परिचारीका भाडेतत्त्वावर राहतात. त्या पॉझिटिव्ह झाल्यावर त्यांच्या घरमालकाने त्यांना घर सोडण्यास सांगितले आहे. आम्ही सध्या घरी परतणार नाही, असे त्यांन सांगितले तरी त्यांचा त्यांचा हेका कायम आहे, त्यामुळे आमची अडचण झाली आहे, असेही त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.  

ऐकलतं का? आळंदीत लावले जातेय चोरून लग्न

राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे काही परिचारिका, डॉक्टरांना पिंपरी चिंचवड, दिघी, औंध आदी लांबवरून ये-जा करावी लागत आहे. अनेकांच्या वाहतुकीचीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. नोकरीची गरज म्हणून हे सहन करावे लागत आहे. सरकार सांगते एक आणि येथे घडतेच भलतेच, असाही अनुभव एका परिचारिकेने सांगितले.
आम्हीला किती दिवस येथे रहावे लागेल, याची खात्री नाही. इथले जेवण घेण्या एेवजी आम्हाला आमच्या काही सहकारी डबे घेऊन येतात, तेवढाच आम्हाला विरंगुळा मिळत आहे, असेही एका परिचारिकेने सांगितले.

'शाळा नक्की कधी सूरू होणार?अद्याप ठोस निर्णय नाही

या बाबत रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. रोटेशन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे ते शक्य नाही. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायचे असले तरी स्थानिक परिस्थितीनुसार त्या बाबत उपाययोजना करण्यात येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT