bacc.jpg 
पुणे

दिव्यांग व्यक्तींसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला 'हा' आदेश 

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारच्या आदेशानुसार पाच टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्याचे बंधन आहे. परंतु कोविड-19 मुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तो निधी तशाच पडून आहे. तो निधी कोणत्या वस्तू अथवा योजनांवर खर्च न करता थेट दिव्यांग व्यक्तींच्या बॅंक खात्यावर जमा करावा, अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि ग्राम पंचायतींनी दिल्या आहेत.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच ग्रामपंचायतींना त्यांच्या अर्थसंकल्पातील एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम ही दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्च करण्याचे बंधन यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. कोविड-19मुळे गेल्या चार महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. परिणामी रोजगार बंद पडल्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींची आर्थिकस्थिती अत्यंत हलाकीची झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी या राखीव निधीतून कोणत्या वस्तू अथवा उपाययोजनांवर खर्च न करता, ती रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावी, अशा सूचना राज्यमंत्री कडू यांनी दिल्या आहेत.

त्याचबरोबरच या काळात महापालिका आणि नगरपालिका यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या घरपट्टी व पाणीपट्टीत दिव्यांग व्यक्तींना पन्नास टक्के सवलत देण्यात यावी, या आदेशाची केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यमंत्री कडून यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महापालिका,नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने त्वरित करावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या विभागीय आयुक्तांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी संघटनेच्या तालुका अध्यक्ष व आळंदीच्या शहराध्यक्ष अर्चना घुंडरे पाटील यांचसह अनिता जाधव, दिनेश मालवीय, शिवाजी सातव यावेळी उपस्थित होते. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर होणार निर्णायक चर्चा ?

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातवर चौदावा गुन्हा दाखल; सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू

नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

Beed News: इकडे आड, तिकडे विहीर; अनेक रस्त्यांवर ब्लॅकस्पॉट; विहिरी ठरतात अपघातांचे कारण

SCROLL FOR NEXT