पुणे

दोन बहाद्दरांकडून पाच दुचाकी जप्त; बारामती पोलिसांची कामगिरी

मिलिंद संगई

बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्रानंतर आज शहर पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करुन त्यांच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या. जवळपास 4 लाख 35 हजारांच्या या दुचाकी आहेत. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. 

चैतन्य पांडूरंग शेळके (वय 19 ) व किशोर सहदेव पवार (वय 19, रा. मोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोतीबाग चौक, इंदापूर रोड येथे  नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान दोघे युवक बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडील बुलेट कसबा  बारामती येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. 

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत  त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाणे व आष्टी (जि. बीड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याच्यी कबुली दिली. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय जगदाळे, अनिल सातपुते, भगवान दुधे, दादासाहेब डोईफोडे, रुपेश साळुंके,सुहास लाटणे, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, दशरथ इंगोले, अकबर शेख, अजित राऊत आदींनी ही कामगिरी केली. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT