Shivnagar_Bridge 
पुणे

'त्या'च पुलाने यावर्षीही केला घात; जीव वाचवण्यासाठी नागरिक पोचले घराच्या छतावर!

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : किरकटवाडी (ता.हवेली) येथील ओढ्याला आलेले पुराचे पाणी शिवनगर भागातील अनेक घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमी उंचीच्या लोखंडी पुलाला पाण्याबरोबर वाहत आलेली झाडे अडकल्याने ही दुर्घटना घडली. नागरिकांना आपला जीव वाचविण्यासाठी कित्येक तास घराच्या छतावर बसून राहावे लागले.

किरकटवाडी गावठाण आणि शिवनगर येथील मावळे आळी या भागाला जोडणारा एक कमी उंचीचा अरुंद लोखंडी पूल काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. मावळे आळी येथील वीस ते पंचवीस घरांसाठी हा एकमेव रस्ता आहे. मागील वर्षी 25 सप्टेंबर 2019 रोजी किरकटवाडी व परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मावळे आळी येथील याच लोखंडी पूलाला पाण्याबरोबर वाहत आलेली झाडे अडकून अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. तेरा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. प्रशासनाने ही घटना टाळण्यासाठी एक वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न केल्यामुळे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुन्हा अनेक घरांचे नुकसान झाले.

पूर्णपणे पाण्याने वेढलेले नागरिक घराच्या छतावरून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत होते. पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मावळे आळीच्या समोरील संरक्षक भिंत तोडून तुंबलेले पाणी काढून दिले.

"आमच्या रस्त्याच्या समस्येबाबत अधिकारी आणि पदाधिकारी कोणीही दखल घेत नाही. ओढ्याचे पाणी शिरल्यानंतर आम्हाला बाहेर पडण्यासाठी कोणताही रस्ता नाही. दोन दोन महिन्यांच्या लहान बाळांना घेऊन आम्हाला जीव मुठीत धरुण छतावर जाऊन थांबावे लागत आहे. प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहत आहे काय?"
- अतुल गायकवाड, रहीवासी, मावळे आळी, किरकटवाडी.

"किरकटवाडीत नाल्याच्या नैसर्गिक पाणी प्रवाहाला अडवून बेकायदेशीर अरूंद आणि कमी उंचीचा पूल बांधल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना आणि सोसायट्यांना पूरपरिस्थितीच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची ग्रामपंचायतीने दखल घ्यावी."
- भाऊसाहेब हगवणे, ग्रामस्थ, किरकटवाडी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: रिल्सच्या नादात जीव गमावला, धबधब्यात पाय घसरून खोल दरीत कोसळला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, Video Viral

Tomato Market: 'लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी टोमॅटो हंगाम ठरला फायदेशीर

Live-in Relationship : महिला लिव्ह-इन पार्टनरला पत्नी इतकाच अधिकार, दोषी पुरुषाला खावी लागणार जेलची हवा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर यांची भक्कम आघाडी; 3 पैकी 2 जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता

Amba Ghat Road Collapse : कोल्हापूर-रत्नागिरी प्रवासापूर्वी ही बातमी वाचा! आंबा घाट बंद झाल्यानंतर अणुस्कुरा मार्गावर काय घडतंय?

SCROLL FOR NEXT