A flute player living with self respect at the age of 72  
पुणे

व्वा, क्या बात है! वयाच्या ७२ व्या वर्षी स्वाभिमानाने जगणारे बासरीवाले आजोबा; एकदा व्हिडिओ बघाच

समाधान काटे

गोखलेनगर(पुणे) :  शिवाजीनगर, डेक्कन परिसरात वाहनांच्या गर्दीत, माणसाच्या वर्दळीतून अचानक बासरीचा सुरेल आवाज ऐकू येतो. हा सुरेल आवाज ऐकू येतो तो म्हणजे बासरीवाले आजोबा यांच्याकडून! लाचार न होता वयाच्या ७२ व्या वर्षी देखील स्वाभिमानाने जगाणारे गंगाधर ईश्वर जाधव उर्फ बासरीवाले आजोबा.

लहानपणी गावाकडे यात्रेत मिळणाऱ्या बासरीचे आकर्षण जाधव यांना निर्माण झाले. बासरी शिकण्यासाठी कुठेही शिकवणी न लावता. जाधव २० वर्षांपासून सुंदर अशी बासरी वाजवत आहेत.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

हेमंत कुमार, किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यासह जुन्या गाण्यावरती बासरीवादन करण्याचे ज्ञान त्यांच्यामध्ये आहे. ते पर्वती या ठिकाणी रहायला असून दररोज गरवारे पूल, जंगली महाराज रस्ता, संभाजी उद्यान, हॉटेल गुडलक, फर्ग्यूसन महाविद्यालय रस्ता या ठिकाणी पदपथावर बसून बासरी वादन करतात.

दिवसभर पदपथावरून जाणारे - येणारे विद्यार्थी, नागरिक आपापल्या आवडीनुसार गाणी सांगतात त्याप्रमाणे जाधव  बासरीवादन करतात. यामधून नागरिक सहखुशीने जाधव यांना दहा, वीस रुपये देतात या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह होते असं ते सांगतात. घरच्यांनी केलेल्या सहकार्यामुळे जाधव रस्त्यावर बसून देखील बासरीवादन करतात. 'रस्त्यावर बसून बासरी वाजवण्यासाठी लाज वाटत नाही' असं देखील ते म्हणाले.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

"सुर, ताल याचे ज्ञान आहे. बासरीवादन करण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न केला.नागरिकांनी संगिताकडे वळावं.जिद्द चिकाटी सोडू नये."
- गंगाधर ईश्वर जाधव उर्फ (बासरीवाले बाबा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT