लसीकरण
लसीकरण 
पुणे

लसीकरणावेळी नागरिकांचे हाल,अपॉइंटमेंट प्रक्रियेत बदलाची गरज

डी. के. वळसे पाटील

मंचर : कोरोनाचा (Corona) भयानक संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण(Covid preventive vaccination) (ता. 1) मे पासून सुरू केले आहे . पण लसीकरण डोस घेण्यासाठी तब्बल 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. ''नागरिकांचे होणारे हाल थांबविण्यासाठी कोविन पोर्टल नोंदणी करुन अपॉइंटमेंट घेण्याची तालुकानिहाय पद्धतीचा अवलंब करावा'' अशी मागणी आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Home Minster Dilip Valse Patil) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याकडे केली आहे. (Follow the taluka wise method of making an appointment by registering the Cowin Portal)

18 ते 44 वयोगटातील कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण डोस गेल्या आठ दिवसात मंचर उपजिल्हा रुग्णालयात आठशे जणांना देण्यात आला. पण त्या मध्ये आंबेगाव तालुक्यातील फक्त 70 जणांनाच लाभ मिळाला आहे. अन्य लाभार्थी हे पुणे व अन्य तालुक्यातील आहेत.

इनामदार यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालय लसीकरण विभागाला भेट दिली. इनामदार म्हणाले, “ कोविन पोर्टलवर नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतलेले एकूण 100 जण लस डोस घेण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात रांगेत उभे होते. त्यापैकी ५ जण आंबेगाव तालुक्यातील होते. अन्य नागरिक मुळशी, पुणे, शिरूर, पिंपरी चिंचवड भागातील होते. त्यानाही दूरवरून मंचर पर्यंत प्रवास करावा लागला. हॉटेल बंद असल्यामुळे जेवन व नाष्टाही त्यांना मिळाला नसल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. त्यांचे अतोनात हाल झाले.” अशीच परिस्थिती आंबेगाव तालुक्यातून कोविन पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्यांची झाली आहे.

आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, सातगाव पठार भागातील नागरिकांना लसीकरणासाठी पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य तालुक्यात जावे लागत आहे. लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातील सर्वच नागरिकांचे अतोनात हाल सुरु आहेत. सद्यस्थितीत वाहतुकीच्या सुविधा नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यशासनाने व आरोग्य विभागाने तालुका निहाय नागरिकांची कोविन पोर्टलवर नोंदणी करून अपॉइंटमेंट देण्याची पद्धत सुरु करावी. लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून प्रत्येक लसीकरण केंद्रात दररोज 500 जणांना लसीकरण डोस मिळतील अशी व्यवस्था करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT