Moscow_Parcel 
पुणे

मॉस्कोला पाठवलेलं 'ते' पार्सल सापडलं मुंबईच्या कस्टम्स विभागात; पोस्टाने घेतली 'सकाळ'च्या वृत्ताची दखल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रशियातील मॉस्कोला पाठविण्यात आलेले खाद्यपदार्थांचे पार्सल अखेर मुंबईच्या कस्टम्स विभागात असल्याचे समोर आले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून या पार्सलचा ठावठिकाणा सापडत नव्हता. कोरोनामुळे रशियातील पार्सल सेवा बंद असल्यामुळे ते मुंबईतच अडकून पडले असून, ते आठ दिवसांत परत करण्यात येईल, असे पोस्टातील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 

अतुल शेजवळ यांनी मॉस्को येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी खाद्यपदार्थांचे पार्सल सहा जुलैला स्पीड पोस्टाने पाठवले होते. त्यासाठी स्पीड पोस्टवर 12 हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु आठ दिवसांत पोचणारे पार्सल अडीच महिने उलटूनही मुलीच्या हाती पडले नव्हते. मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही ते पार्सल कोठे आहे, याची माहिती मिळत नव्हती. अशा प्रकारे इतर काही पालकांनीही त्यांच्या मुलांसाठी पाठवलेले खाद्यपदार्थ साहित्याचे पार्सल मिळालेले नाही. याबाबत पोस्टातील कर्मचाऱ्यांकडूनही व्यवस्थित उत्तर दिले जात नव्हते. 

पोस्टाच्या या कारभाराविरोधात 'सकाळ'ने बुधवारी (ता.16) वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत त्या पार्सलचा शोध घेण्यात आला. ते पार्सल कस्टम्स विभागातून परत मिळवून दिले जाईल, असे पोस्टातील अधिकाऱ्याने सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 10 जुलैपासून रशियाने विमान सेवा बंद केली आहे. सध्याही ही सेवा बंदच आहे. त्यामुळे ते पार्सल मुंबईच्या कस्टम्स विभागातच आहे. ज्यांना पार्सल परत हवे असल्यास त्यांनी मुख्य पोस्ट कार्यालयात प्रत्यक्ष, संकेतस्थळावरील तक्रार कक्षात किंवा puneho@indiapost.gov.in ई-मेलद्वारे अर्ज करावा. त्यांना मुंबईपर्यंतच्या स्पीड पोस्टाचा खर्च वगळून पार्सल आणि उर्वरित खर्चाची रक्‍कम परत करण्यात येईल. 
- बी. पी. एरंडे, वरिष्ठ पोस्ट मास्तर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT