Food stall owner Rikshaw driver Are still facing Problems due to police in pune 
पुणे

खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षाचालकांना पोलिसांचा जाच सुरूच !

सकाळवृत्तसेवा

पुणे ः संचारबंदीमध्ये सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी खाद्यपदार्थ स्टॉल, रिक्षा सुरू ठेवण्यास महापालिकेच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्तांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही नागरिकांना त्रास होणार नाही, असे वारंवार स्पष्टीकरण दिले जात आहे. प्रत्यक्षात मात्र पोलिसांकडून खाद्यपदार्थ स्टॉल बंद करण्यापासून रिक्षा चालकांना हुसकावून लावण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचना कनिष्ठांपर्यंत पोचत नसल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील निर्बंधामधून अत्यावश्‍यक सेवेमध्ये येणाऱ्या काही घटकांना महापालिकेच्या आदेशानुसार सवलत देण्यात आली आहे. विशेषतः खाद्यपदार्थांचे स्टॉल, रिक्षांना काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनीही पोलिस नागरिकांचा संवेदनशीलतेने विचार करतील, अशी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव खाद्यपदार्थ विक्रेते व रिक्षाचालक घेत आहेत.

बिबवेवाडीतील आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयासमोर खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणारे अण्णा पावसकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या आदेशानुसार खाद्यपदार्थाची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सकाळी साडेअकरा वाजता पोलिसांनी स्टॉल बंद करण्यास सांगितला. त्यांना आदेशाबाबत बोललो, तर साहेब आल्यावर तुमच्यावर खटला भरतील, असे त्यांनी सांगितले. अखेर मला स्टॉल बंद करावा लागला. माझ्याकडे नाशवंत माल असतो, त्यामुळे मला आर्थिक भुर्दंड बसला आहे.’’

पुणे ऑटो रिक्षा फेडरेशनचे सचिव बापू भावे म्हणाले, ‘‘अत्यावश्‍यक सेवा म्हणून वाहतुकीमध्ये अन्य वाहनांसह रिक्षांना परवानगी आहे. तरीही स्वारगेट, हडपसर, वानवडी, कर्वे रोड, कोंढवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून रिक्षा चालकांना हुसकावून लावले जात आहे. नागरिकांची सोय होत आहे. असे असतानाही पोलिसांकडून मात्र रिक्षाचालकांना त्रास दिला जात आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

SCROLL FOR NEXT