Footpath 
पुणे

फुटपाथ मोकळा श्वास कधी घेणार? जुन्नरमधील विक्रेत्यांनी घेतला फुटपाथचा ताबा

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर (पुणे) : जुन्नर-नारायणगाव रस्त्यावरील फुटपाथ मोकळा श्वास कधी घेणार आणि पायी चालणाऱ्यासाठी केव्हा उपलब्ध होणार हा येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे.

किल्ले शिवनेरी परिसर विकास कार्यक्रमांतर्गत जुन्नर शहराचे प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या काँक्रीटच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. दोन्ही बाजूने पायी चालणाऱ्यासाठी दुतर्फा फुटपाथ करण्यात आला मात्र त्यावर अनेक ठिकाणी जागोजागी अतिक्रमण झाले असल्याचे दिसून येत आहे.

परदेशपुरा ते बसस्थानक रस्त्यावर तर एका बाजूला गेल्या अनेक महिन्यापासून भाजी आणि फळ विक्रेत्यांनी ठाण मांडून आपली हक्काची जागाच निर्माण केली आहे. तर नवीन बस स्थानकाजवळ असणाऱ्या फुटपाथवर देखील फळ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे ते छोटे पडू लागले आहेत. येथील स्वच्छता मात्र नगर पालिकेला करावी लागत आहे. खराब झाल्याने विक्रेत्यांनी टाकून दिलेल्या भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरे येत असल्याने त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारचाकी, दुचाकी घेऊन खरेदीस येणारे रस्त्याच्या कडेला गाडी लावून खरेदी करत असल्याने वाहतुकीची समस्या देखील निर्माण होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका प्रशासन यांनी या प्रश्नांत लक्ष घालणे जरुरीचे झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेला दर रविवारी भरणारा जुन्नर शहराचा आठवडे बाजार बंद आहे. मात्र तो देखील हळूहळू विनापरवाना सुरू झाला आहे. बाजारात होत असलेल्या गर्दी मुळे सामाजिक अंतर, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर याला हरताळ फासला गेला आहे. यावर कोणाचे नियंत्रण नसल्याची सद्यस्थिती आहे. 

"फुटपाथ तसेच रस्त्याच्या कडेला बसणारे भाजी, फळ व अन्य विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नगरपालिका अशा कोणत्याही विक्रेत्याकडून भुईभाडे घेत नाही तरी देखील हा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदरी पार पाडत आहे. आठवडे बाजार नियमित सुरू करण्यासंबंधी विचार करण्यात येणार आहे."
- मच्छिन्द्र घोलप, मुख्याधिकारी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात दोन ठार; सिंदेवाही, सावली तालुक्यांतील घटना, नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण

ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १६ जणांचा मृत्यू; हल्लेखोर बापलेक पाकिस्तानचे

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता!

Nagpur Crime: वाटणीवरून थोरल्‍याने केला धाकट्याचा खून; मोहगाव सावंगी, नाल्यात जळालेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

Panchang 15 December 2025: आजच्या दिवशी विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT