पुणे

चिंकारा शिकार प्रकरणी दोघांना वनविभागाकडून अटक

सचिन लोंढे

कळस : इंदापूर तालुक्यातील कळस - काझड वनालगत चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पळून जात असताना दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. मृत हरणा समवेत त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे एक बंदूक, सहा जिवंत काडतुसे एक पुंगळी व सर्च लाईट सह मोटार सायकल (क्रमांक एम. एच. 42 ए. व्ही. 2111) आदी मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तालुक्यातील काझड फॉरेस्ट गट नंबर 345 व कळस फॉरेस्ट गट नंबर 40 लगत बोरी- अकोले फिरंगाई मंदिर रस्त्यावर रात्री गस्त घालत होते. आरोपी महेश जंगलु माने (वय 40, रा. सणसर ता. इंदापूर) व दत्तात्रेय पोपट पवार (वय 42, रा. बोरी, ता. इंदापूर) हे दोघेजण चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून ते मोटर सायकल वरून घेऊन जात असताना आढळून आले. वन कर्मचाऱ्यांना बघून ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या आरोपींना शिकारीचे साहित्य व शिकार केलेल्या मृत हरणासमवेत ताब्यात घेतले आहे. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे वनपाल अशोक नरोटे वन रक्षक पूजा काटे वनमजूर ज्ञानदेव ससाने आदींनी ही कारवाई केली.

इंदापूर तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याची या महिन्यातील ही दुसरी घटना उघडकीस आली आहे. 1 मे च्या रात्री खोकड प्राण्याची शिकार केल्याच्या आरोपाखाली कुंभारगाव येथील दोन आरोपी ताब्यात घेतले होते. यानंतर आज रात्रीचा घटनेने तालुक्यातील वन्य प्राणी असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.

वनगुन्हा करणार्यांची गय केली जाणार नाही. आम्ही रात्रीची गस्त वाढवली आहे. खबर्यांची संख्या वाढवली आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांनी शिकार केलेल्या हरणाचे मांस कुठे विक्री करणार होते याचा तपास करून अन्य काही आरोपी हाती लागण्याची शक्यता असल्याचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT