Pune Zilla Parishad Praveen Mane house Deputy Chief Minister Devendra Fadnavis sakal
पुणे

Baramati Loksabha: बारामती जिंकण्यासाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! थेट सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखांनाच गाठलं

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला उपस्थित होते |Former Construction and Health Chairman of Pune Zilla Parishad Praveen Mane was present at the reception of Deputy Chief Minister Devendra Fadnavis.

संतोष आटोळे

Baramati Loksabha: आगामी काळात इंदापूर तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्याचे संकेत मिळत असून खासदार सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला उपस्थित होते.

त्यानंतर शरद पवारांची सावली म्हणून ओळख असणारे सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांच्या घरी फडणवीस यांनी भेट दिली. यामुळे इंदापूर तालुक्यात उलट सुलट राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार (ता.05) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. यावेळी हेलिपॅड वर फडणवीस यांच्या स्वागताला पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती व खासदार सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण माने उपस्थित होते.

त्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले तसेच त्यानंतर स्वतः फडणवीस हे सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांच्या घरी भेट दिली यावेळी कोणती राजकीय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

मात्र दशरथ माने प्रवीण माने यांची शरद पवारांच्या सभेला अनुपस्थिती आणि आज फळी फडणवीसांची सोनाई परिवाराच्या घरी भेट यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान या भेटीवेळी आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक कुमार माने युवा उद्योजक अतुल माने यांच्यासह माने कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.

रविवारी भूमिका स्पष्ट करणार - दशरथ माने

याबाबत सोनई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने दैनिक सकाळ प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, सदर भेट ही कौटुंबिक भेट होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे जुने संबंध आहेत त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन चहा पान व अल्पोपहार घेतला यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तर प्रवीण

माने म्हणाले, आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून रविवार (ता.07) रोजी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT