Delhi Crime News esakal
पुणे

पुणे हादरलं! माजी सरपंचाचा अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेवून बलात्कार; पोलिसांनी रंगेहात पकडलं

सकाळ डिजिटल टीम

पुणे - मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका माजी सरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संतोष नाझिरकर (४०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नझिरकर हे पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाचे माजी सरपंच आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसातच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. बुधवारी बाहेर जेवायला जाऊ अस सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पीडित मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT