Ghodsavari 
पुणे

शिवनेरी ते सारंगखेडा 'त्याने' 5 दिवसांत गाठला पण...

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : अश्वप्रेमी अमित सतीश खत्री या युवकाने शिवनेरी ते सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) हा 350 किलोमीटरचा प्रवास घोड्यावरून पाच दिवसांत पूर्ण केला.

पुणे: उधारी मागतोस का? तुझा धंदा बंद करेल...

अमित सोमवारी (ता. 23) सायंकाळी जुन्नरला परत आला. राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान एकमुखी दत्ताचे स्थान असलेल्या सारंगखेडा येथे सुमारे 300 वर्षांपासून यात्रेची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून ही परंपरा सुरू असून दत्तजयंतीच्या संपूर्ण महिन्यात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसह घोड्यांचा मोठा बाजार भरतो. यावेळी आयोजित चेतक महोत्सवात घोड्यांच्या शर्यती देखील होतात. अमितने गेल्या तीन वर्षांत येथील शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावर्षी काही कारणास्तव या महोत्सवात घोड्याच्या शर्यती रद्द केल्याने त्याने यावेळी शिवनेरी ते सारंगखेडा प्रवास घोड्यावरून करण्याचे ठरविले. त्याने सुनील शिंदे यांना दिलेली सोनी नावाची घोडीची निवड करून हा प्रवास पूर्ण केला. अमितकडे शर्यतीचे दोन, घोडेस्वारीसाठी दोन व एक शिंगरू असे पाच घोडे आहेत.

जुन्नर तालुक्‍यात व परिसरात घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन देखील तो करतो. घोड्यावरील प्रवासात पेमगिरी किल्ल्याजवळील निमगाव पागा, कोळपेवाडी, मनमाड, कुसुंबा, दौंडाई व सारंगखेडा येथे त्याचा मुक्काम झाला. या अश्व प्रवासाबद्दल त्याचा चेतक महोत्सवात दोंडाईचे सरकारसाहेब रावल व चेतक महोत्सवाचे अध्यक्ष जयपाल रावल यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला. सारंगखेडा येथे वाद्याच्या गजरात स्वागत केले. जुन्नरला ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरात समारोप झाला. यावेळी नगराध्यक्ष श्‍याम पांडे,अनिल जोगळेकर, सुनील शिंदे,रमेश खत्री, रवींद्र काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

घोड्यावरून प्रवास करताना सुरवातीला अनेक शंका कुशंका येत होत्या. साठ किलोमीटरचा पहिला टप्पा पार केला आणि उत्साह वाढला. दुसरा टप्पा देखील विनासायास पार पडला. प्रवासात घोड्याची साथ मिळाली अन विश्वास वाढत गेला. हा प्रवास सहा दिवसांत पूर्ण करण्याचे ठरविले असताना पाचव्या दिवशी पूर्ण झाला.
- अमित खत्री, अश्वप्रेमी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT