found a broken idol of Lord Shiva in the form of Ardhnarinateshwar in Daund pune district 
पुणे

दौंडला सापडली अर्धनारीनटेश्वर रूपातील महादेवाची भग्न मूर्ती; भीमेकाठी पर्यटकांची गर्दी 

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात भीमा नदी पात्रात सापडलेल्या अर्धनारीनटेश्वर रूपातील महादेवाची भग्न मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सिमेंट कॉंक्रिटच्या या मूर्तीच्या मुखाची उंची ५ फूट ७ इंच आहे. 

दौंड - नगर - मनमाड हा अंतर २४७.५ किलोमीटर अंतर असलेला ब्रिटीशकालीन लोहमार्ग सध्या एकेरी असून त्याचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. या लोहमार्गाचे दुहेरीकरण अंतर्गत दौंड येथील भीमा नदी पात्रातील ब्रिटीशकालीन दगडी रेल्वे पुलाशेजारी नवीन रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना एक अर्धनारीनटेश्वर महादेवाचे फक्त मुख असलेली भग्न मूर्ती सापडली आहे. 

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...

सदर मूर्ती सिमेंट कॉंक्रिटची असून मुखाखाली विटांचा थर आहे. सदर मूर्तीची उंची ५ फूट ७ इंच असून रूंदी २ फूट ९ इंच आहे. काही उत्साही भाविकांनी भग्न मूर्तीस हार वाहिले आहेत.

नाताळ निमित्त आलेल्या सलग सुट्टया व रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने कुतूहलापोटी नागरिक सहकुटुंब मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. तर युवा वर्ग दुचाकीवरून येऊन मूर्तीसह सेल्फी घेत आहेत. 

जाहिरातींचे होर्डिंग पुणेकरांच्या जिवावर;अपघातांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्‍चित करा

भीमेच्या पात्रात विसर्जन
दौंड येथील भीमा नदीचे पात्र चंद्रकोर आकाराचे असून हीच भीमा नदी दौंड - सिध्दटेक मार्गे वाहत पुढे पंढरपुरात चंद्रभागा नावाने पूजली जाते. पुराच्या पाण्यात अनेक भग्न मूर्त्या वाहून नदी पात्रात येत असतात. अर्धनारीनटेश्वर महादेवाच्या मूर्तीचे नाक व कान भग्न झालेले असून पुणे किंवा नगर जिल्ह्यातून कोणीतरी ही मूर्ती भग्न झाल्याने नदी पात्रात विसर्जित केली असल्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT