Four out of five patients affected corona virus have good health in pune 
पुणे

Coronavirus: पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट्स समोर; प्रकृती...

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना बाधित पाच रुग्णांपैकी चौघांची तब्येत उत्तम आणि स्थिर आहे. तर एका रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; रुग्णांची संख्या...

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ''शहरात सध्या पाच रुग्ण कोरोना बाधित आहेत. तर, अन्य 17 संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दहा जणांच्या नमुना तपासणीचा अहवाल आज सायंकाळपर्यंत येईल. मगरपट्टा आणि हिंजवडीसह काही आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. आयटी कंपन्यांच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर अफवा पसरवू नये. संबंधितावर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येईल, असे म्हैसेकर यांनी नमूद केले.

Coronavirus : कोरोनाग्रस्तावर 'एचआयव्ही'चा उपचार

शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. याबाबत आवश्यकता भासल्यास तशा सूचना देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

कोरोना भीती नको काळजी हवी!

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
पुणे जिल्हा तसेच विभागातील कोरोना आजाराच्या उद्भवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी सद्यस्थितीत करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात आल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT