Fraud by buying Car in the name of Girl by Pretending to get married in Pune 
पुणे

'तो' स्पोर्टस कार घेऊन गेला अन् परत आलाच नाही, कारण...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शादी डॉट कॉम या लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटद्वारे त्यांची ओळख झाली. ती नामांकीत कंपनीत 'एचआर' पदावर काम करणारी, तर त्याने मात्र, आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे तिला भासवून तरुणीशी ओळख वाढविली. तिला त्याच्या कुटुंबीयांशी भेटवलेही, हळूहळू तिचा विश्‍वास मिळवून तिच्या नावे बँकेतून तब्बल सात लाखांचे कर्ज घेऊन स्पोर्टस्‌ कार खरेदी करुन त्याने कायमचीच 'धुम' ठोकली ! 

वानवडी येथे राहणारी 30 वर्षीय तरुणी शहरातील एका नामांकीत कंपनीमध्ये 'एचआर' म्हणून कार्यरत आहे. लग्नगाठ जुळविण्यासाठी तिने शादी डॉट कॉम या वेबसाईटवर तिची इत्यंभुत माहिती भरली. त्यानंतर एक दिवस एका तरुणाने तिच्याशी संपर्क केला. आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे तरुणीला सांगितले. त्यामुळे तिनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

कामशेतमध्ये व्यापाऱ्याच्या घरावर फेकले टाचण्या लावलेले लिंबू

हळूहळू व्हॉटस्‌अप, मेसेजद्वारे त्यांच्यात ओळख वाढत गेली. त्याने तरुणीसमवेत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसाने त्याने तरुणीला त्याच्या भावाला व वहिनीला भेटविले, तर एकदा वडीलांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून दिला. आता मात्र तरुणीचा त्याच्यावर चांगलाच विश्‍वास बसला. त्यानंतर त्याने तरुणीला गोड बोलून तिच्या नावावर एका बँकेमध्ये सात लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून त्याने नामांकीत कंपनीची स्पोटर्स्‌ कार खरेदी केली. त्यानंतर तो कार घेऊन गेला, तो पुन्हा माघारी आलाच नाही. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला.

No Internet, No Rumors : कोरेगाव भीमा परिसरात इंटरनेट 'ब्लॉक'
 

पोलिसांनी त्याची माहिती मिळविली. तेव्हा संबंधीत तरुणाचे लग्न झाले होते. त्याने स्वतःचे खोटे नाव सांगून लग्न झाल्याचे लपवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसणूक केली. याप्रकरणी तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्याने याच पद्धतीने त्याने एका महिलेसह तिघांची याच पद्धतीने फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भुषण पोटवडे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT