No Internet, No Rumors : कोरेगाव भीमा परिसरात इंटरनेट 'ब्लॉक'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

ग्रामीण पोलिसांकडून सतर्कतेचा उपाय म्हणून, अफवा पसरू नयेत इंटरनेट सुविधा बंद केली जाणार आहे. मात्र नागरीकांना तत्काळ संपर्क साधायचा असल्यास त्यासाठी खास 'इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन'ची व्यवस्था जिल्हाधिकारी प्रशासनाने केली आहे.

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी बुधवारी एक जानेवारीला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. संबंधीत ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अफवा पसरू नयेत, यादृष्टीने ग्रामीण पोलिसांकडून विजयस्तंभ परिसरात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. 

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती

'इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन' (Emergency Communication Plan)
ग्रामीण पोलिसांकडून सतर्कतेचा उपाय म्हणून, अफवा पसरू नयेत इंटरनेट सुविधा बंद केली जाणार आहे. मात्र नागरीकांना तत्काळ संपर्क साधायचा असल्यास त्यासाठी खास 'इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन'ची व्यवस्था जिल्हाधिकारी प्रशासनाने केली आहे. गर्दीच्या ठिकाणी इंटरनेट वापराला अडचण येते. मात्र "इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन'मुळे नागरीकांना मदत मिळू शकणार आहे. याबरोबरच पोलिस व अन्य अत्यावश्‍यक सेवांसाठी खास हॉटलाईनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

'या' कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंपन्या, शाळा, आठवडे बाजार बंद 
अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. ही समस्या यावर्षी होऊ नये, यादृष्टीने परिसरातील खासगी कंपन्या, शाळा, आठवडे बाजार बंद ठेवाव्या लागणार आहेत. तसेच वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापुर, सणसवाडी यांसारख्या काही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. 

'यांनी' रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट 

समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशा सुचना, सोशल मिडीयावर लक्ष 
विजयस्तंभाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमधून समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा समाज विघातक वक्तव्ये केली जाऊ नयेत, यादृष्टीने संबंधीतांना जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे सुचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याबरोबरच पथके नेमण्यात आली आहेत.

कोरेगाव भीमाला जातायं? असा आहे वाहतुकीचा मार्ग

 अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी
शांततेचे फलक, होर्डींग्ज वगळता अन्य फलक, होर्डींग्ज काढण्यात आली आहेत. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या संभाजी भिडेंची 'ही' आहे ओळख?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internet Block in Koregaon Bhima area to avoid rumors